ओम जय हो विश्वात्मका परिवाराची स्थापना श्री नाथ भक्त परम पूज्य श्रीनाथजी दिगंबर दास घारे महाराज यांनी २००० साली केली. या परिवाराची स्थापना करण्यामागे प्रत्येक मानवी जिवाला आत्मोध्दाराचा मार्ग दाखवणे हा हेतू आहे. या परिवारा तर्फे दत्तजयंती, गुरुपोर्णिमा, महाशिवरात्र व गुरूप्रतिपदा हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. परिवाराची स्थापना केल्यानंतर महाराजांनी पायी नामवारी चालू केली. परिवारातील साधकांना बरोबर घेऊन महाराज स्वतः पुण्यातून पहाटे ५ वाजता नामरारी करत चालत भुकूम येथिल श्री हरीराम आश्रय मठ येथे जात. मठात आल्यावर ओंकार साधना आणि सस्तंग होत असे. परिवाराने पुण्यातील विठ्ठलवाडी येथिल विठ्ठल मंदिरातही काही काळ साधना केली.
पुण्या जवळील मांडवी गावा जवळ मोठा डोंगर आहे. तेथे वाल्मीकी ऋषींनी स्थापन केलेले 'जर्शेश्वर' नावाचे महादेवांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात २००४ साली पार्वती मातेच्या मूर्तीची स्थापना महाराजांनी केली.
साधकाने अनुग्रह घेतल्यानंतर काय साधना करायची यासाठी संपूर्ण साधनेची माहीती असलेली न्यास साधन पुस्तिका तयार केली. या पुस्तिके मार्फत लहान अथवा मोठ्या सर्व साधकांना साधना अतिशय सोप्या मार्गने ऊपलब्ध करीन दिली.
श्रीनाथजी दिगंबरदास घारे महाराजांच्या मुखातून जे अनमोल प्रवचनाचे बोल बाहेर पडतात त्याने अनेकांना जीवनाची नवी वाट मिळते. अशा प्रवचनांच्या सि.डीज् परिवाराने उपलब्ध करून दिल्या आहेत. आध्यात्मिक जीवनाच्या अनेक वाटांमधून नेमकी कोणती वाट ईश्वरापर्यंत लवकर पोहोचते असा प्रश्न असतो पण नाथजींचा 'गुरूमुखवाणी' हा ग्रंथ परिवाराने प्रकाशीत केला या ग्रंथामुळे साधकांना साधनेची वाट सोपी झाली आणि हा ग्रंथ साधकांना साधने साठी प्रेरणादाई ठरत आहे. नाथजींच्या 'दासवाणी' या नविन पुस्तिकेचे प्रकाशन परिवार लवकरच करणार आहे.
परिवारात वयाच्या दहाव्यावर्षी गुरूदिक्षा दिली जाते. त्यामुळे लहानपणा पासूनच मुलांवर योग्य ते सत्य संस्कार होतात. परिवारा तर्फे १०वी व १२वी च्या ऊतीर्ण विद्यार्थ्यांना परिवाराचे बोधचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले जाते. परिवाराने पुण्यातील अंधःमुलींच्या शाळेतील विद्यार्थनींना ॐकार साधना शिकवून त्यांना जिवनाची नवी दिशा दिली.
परिवारातील साधकांना आत्मोध्दाराचा मार्ग मिळतो त्याच प्रमाणे त्याच्या सर्व कुटुंबियांना ज्ञानाचा मार्ग मिळतो. परिवारातील कुठल्याही कुटुंबाच्या अडचणीत संपूर्ण परिवार मदतीचे कार्य करतो.
अशा सत्यमार्गाचा अवलंब करणारर्या ओम जय हो विश्वात्मका परिवारात विश्वातील सर्व बंधू-भगिनींचे मनःपूर्वक स्वागत. ॐ जय हो!